
दहा विद्यार्थिनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण…
अमळनेर:- येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलची मौर्विका वैद्य तालुक्यातून प्रथम आली असून दहा विद्यार्थिनी नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

शहरातील साने गुरुजी कन्या शाळेतील इ. 10 वीसाठी शाळेतून 119 विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 118 उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल 99.15% लागला आहे त्यात 10 विद्यार्थिनी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाल्या असुन, प्रथम मौर्विका मिलिंद वैद्य 97.00%, द्वितीय सई विलास पाटील 96.20%
तृतीय चेतना प्रविण पाटील 95.00% चतुर्थ आदिती अंकुश पाटील 94.60% पाचवा क्रमांक मयुरी गणेश येवले 93.00% हिने मिळवला आहे. तसेच ६३ विद्यार्थिनी डिस्टिंक्शनमधून तर जवळजवळ सर्वच विद्यार्थिनी प्रथम वर्गात पास झाल्या आहेत. संस्कृत विषयात सई विलास पाटील व मयुरी गणेश येवले यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे संस्थापक मा. आ. साथी गुलाबराव वामनराव पाटील, अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, शालेय समिती अध्यक्ष ॲड. अशोक बावीस्कर, सर्व संचालक मंडळ यांनी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. शाळेने तालुक्यातून सर्व प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवली आहे.








