
अमळनेर:- येथील स्व.सौ.पी. एन. मुंदडा माध्य. विदयालयाचा दहावीचा १०० टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवत यश संपादन केले आहे.

अमळनेर शहरातील स्व. सौ. पद्ममावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालयाचा 100/ निकाल लागला. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून कु.वासुदेव दिलीप पाटील 89.60 %(प्रथम) कु.ओम युवराज पाटील 87.20 % (व्दितीय), कु.भाग्यश्री माळी 86.00% (तृतीय) कु.मोहिनी मनोज पाटील 85.40%(चतृर्थ) व पाचवा क्रमांक जाधव दर्शिका मच्छिंद्र 83.80% यांनी प्राप्त करुन यश संपादन केले.
विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा,सचिव नरेंद्र मुंदडा, सहसचिव योगेश मुंदडा तसेच मुख्याध्यापक,सर्व शिक्षक & शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.








