
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील न्यु इंग्लिश स्कूलचा इ.१० वीचा १०० टक्के निकाल लागला असून उज्वल यश विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे.

ग्रामविकास शिक्षण मंडळ, मारवड संचलित न्यु इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. पाटील रोहिणी लक्ष्मण हिने 91.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक, कु. कुमावत मयुरी संभाजी 89.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक, कु. भोई नंदनी युवराज हिने 88.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.








