गरीब शेतमजुरांच्या दागिने व पैश्यांसह मंदिराच्या दान पेटीवर मारला डल्ला…
अमळनेर:- तालुक्यातील दोधवद व हिंगोणे खुर्द गावाला मंदिरांसह तीन घरे फोडून गरीब शेतमजुरांच्या दागिन्यांसह दानपेटीतील रक्कम अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना १ मे रोजी रात्री घडली.
अमळनेर तालुक्यातील दोधवद येथील गावाच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या भरत झगा भोई हे बाहेर झोपलेले असताना चोरट्यानी मागच्या बाजूने घरात प्रवेश करून ४० भार चांदी, २ ग्रॅम सोने व रोख पाच हजार रुपये असा ३५ हजाराचा ऐवज तर जवळच असलेल्या हिंगोणे खुर्द गावात प्रवीण हिम्मत कोळी या मजुराच्या घरात मागच्या बाजूने शेतातून प्रवेश करून २० हजार रुपये व २ हजाराची चांदी तर उखा सखाराम कोळी यांच्या पत्नीने काढलेल्या बचत गटाचे कर्जाची रक्कम ११ हजार रुपये रात्री घरात घुसून काढून घेतले. त्याच प्रमाणे म्हाळसादेवी माता मंदिरातील दानपेटी काढून त्यातील सुमारे तीन हजार रुपये चोरून नेले आणि दानपेटी गावाबाहेर फेकून दिली. असा एकुण ७१ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात लोक बाहेर झोपलेले असतात आणि गरीब मजूर घराला कुलूप देखील लावत नाहीत त्याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला असून याप्रकरणी मारवड पोलीसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.