गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांचे पालकांना आवाहन…
अमळनेर:- शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी विद्यार्थ्यांचा नवीन प्रवेश घेतांना पालकांनी शाळा मान्यता व इतर मान्यतांची खात्री करूनच प्रवेश घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी केले आहे.
राज्यात अनधिकृत शाळांचा मुद्दा चर्चेत आहे.काही शाळा हे शासनाचे नियमांचे पालन,अटी व शर्थीची पूर्तता न करता विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.राज्य मंडळाची परवानगी घेऊन इतर अभ्यासक्रम विना परवानगी शिकवतात अश्या अनधिकृत शाळांवर आरटीइ कायदा २००९ चे कलम १८ (५) नुसार फौजदारी कारवाई करण्यात येते.त्यामुळे पालकांनी शाळेत प्रवेश घेतांना शाळा मान्यता कागदपत्रांची पाहणी करावी.त्यात यु डायस क्रमांक,तसेच शाळा व्यवस्थापन प्रकार बघून पाल्यांचा प्रवेश घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावरून केले आहे.