पर्यावरण दिनाचे औचित्य साधत राबवला उपक्रम..
अमळनेर:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी लागवड केलेल्या रोपात पर्यावरण पूरक अश्याच रोपांची लागवड करण्यात आली असुन यावेळी शाळेचे मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे , उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर, सर्व शिक्षक वृंद व इयत्ता दहावीतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतील मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक यांनी वृक्ष संवर्धनाविषयीची संकल्पना पटवून दिली तसेच पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरण रक्षण करणे काळाची गरज आहे म्हणून झाडे लावणे व झाडे जगवणे ही काळाची गरज आहे असा संदेश या निमित्ताने विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला.