मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविला उपक्रम, मा.आ. स्मिता वाघ यांची उपस्थिती…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडा येथील विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत मा. आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
दि.१० जून रोजी करणखेडा विद्यालयात मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत इ. 8 ते 10 तील 2 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या 22 विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या, त्यांची अमळनेर विधानसभा निवडणूक प्रमुख पदी निवड झाल्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात मा.आ. वाघ यांनी मुलींना सायकलींचा वापर शिक्षणाकरिता येण्या – जाण्याच्या कामासाठी अगत्याने करावा, मुलींनी सायकली विकू नयेत. आपल्या लहान भाऊ,बहीण यांना शाळेत येण्या जाण्यासाठी द्याव्यात. मुलींनी खूप शिकावे व मुख्य प्रवाहात सामील व्हावे, यासाठी अनेक दाखले दिलेत. व मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे शाळेचे माजी मुख्याध्यापक पी. ए. सोनवणे व पवार सर (प्रभारी मुख्याध्यापक) यांचा सत्कार केला. इ.10 मध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. समीक्षा किशोर पाटील हिचा देखील सत्कार केला. तसेच पंचायत समितीच्या वतीने यावर्षी करणखेडे विद्यालयातील शिक्षक आनंदा बापू धनगर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा देखील सत्कार केला. तसेच शिक्षक प्रतिनिधी मधून प्रशांत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात जयवंतराव पाटील यांनी शाळेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी ग्राम विकास शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, देविदास साळुंखे, देविदास पाटील, साहेबराव पाटील, महारु सिसोदे, वाय. के. पाटील, सुरेश साळुंखे,दिनेश साळुंखे, चंद्रकांत शिसोदे, विश्वासराव पाटील, लोटन पाटील, मनोज साळुंखे, सुरेश शिंदे, आर. एफ.पाटील, के.व्ही. पाटील तसेच करणखेडा गावच्या सरपंच श्रीमती कविता पाटील व उपसरपंच कविता धनगर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी हातभार लावला व सूत्रसंचालन एन. एस. पवार यांनी केले.