अमळनेर:- येथील डॉ. मयुरी विक्रांत पाटील, ह्या पदव्युत्तर एमएस (स्त्रीरोगतज्ज्ञ) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डॉ. मयुरी विक्रांत पाटील यांचे माध्यमिक व उच्च-माध्यमिक शिक्षण हे धुळे येथील जयहिंद महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण ‘काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे’ येथून पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण हे ‘पद्मश्री विठ्ठलराव विखे मेडिकल कॉलेज, अहमदनगर’ येथून विशेष प्रावीण्य घेऊन पूर्ण केले. डॉ. मयुरी ह्या अमळनेर येथील पद्मश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ.विक्रांत पी. पाटील यांच्या पत्नी आणि स्वर्गीय डॉ. पी. एन.(के.) पाटील (माजी वैद्यकीय अधिकारी, अमळनेर) व प्राजक्ता पी. पाटील यांच्या स्नुषा आहेत. तसेच त्या दिलीप पुरुषोत्तम पवार (माजी अभियंता पाटबंधारे विभाग, धुळे) आणि वैशाली दिलीप पवार यांच्या कन्या आहेत. येणाऱ्या काळात “लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया” ह्या विषयात फेलोशिप करण्याचा व डॉ.पी एन पाटील (सासरे) यांचा वैद्यकीय वारसा असाच पुढे सुरू ठेवत रुग्णसेवा करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.