
आज रोजी बँकेचे कर्ज वसुली संदर्भात जे धोरण आहे, त्यानुसार नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फक्त मुद्दल रक्कम घेवून कर्जवसुली दाखवत आहेत. परंतु सदरील रक्कम जेव्हा सोसायटी खात्यातून बँक खात्यात जमा होत असते तेव्हा बँक अगोदर एकूण कर्जाचे व्याज वसूल करत आहे, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सोसायटीवर अतिरिक्त आर्थिक बोझा पडत असून संस्थेच्या आर्थिक परिस्थितीत धोका पोहचत आहे. त्यामुळे सोसायटीकडून सभासदांच्या कर्जाची मुद्दल रक्कम जेव्हा बँकेत जमा होईल तेव्हा फक्त मुद्द रक्कम च कर्जात जमा होईल असे धोरण राबवावे, त्यामुळेच सभासद संस्थांचे अस्तित्व टिकेल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन चेअरमन देवकर यांना देतेवेळी प्रा. सुभाष पाटील, सुरेश पिरण पाटील, राकेश मुंदडा आदी मान्यवर उपस्थित होते.






