
अमळनेर:- तालुक्यात काल १० कोरोना बाधीत आढळले असून मारवड पोलीस ठाण्याचा अजून एक कर्मचारी कोरोना बाधित आढळला आहे.
तालुक्यात काल १० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. यात २ ग्रामीण भागात व ८ शहरी भागात आढळून आले आहेत. शहरातील ८ पैकी चार रुग्ण आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील तर चार नवीन रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ३८ वर पोहचली आहे. एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.





