अमळनेर:- शहरातील झामी चौक भागात ऑनलाईन सट्टयाच्या अड्ड्यावर अमळनेर पोलिसांनी कारवाई करत ३ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे.
महेंद्र सुदाम महाजन हा onlinematka.com या नावाची अवैधरीत्या बनावट जुगार वेबसाईट तयार करून राज्यातील व परराज्यातील लोकांकडुन आकड्यावर सट्टा स्विकारुन जुगार खेळत असतो तसेच अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांना मिळाल्यावरुन त्यांनी याबाबत खात्री करुन कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेशित केल्याने पो.नि. जयपाल हिरे यांनी पथकातील अंमलदार पोउनि शत्रुघ्न पाटील, पोहेकॉ. किशोर पाटील, पोहेकाँ रेखा ईशी, पोना. दिपक माळी, पोना. सिध्दांत सिसोदे, पोकाँ रविंद्र पाटील,पोकॉ आशिष गायकवाड, पोकाँ अमोल पाटील, पोकाँ निलेश मोरे, पोकाँ अतुल मोरे, पोकाँ नम्रता जरे यांनी अमळनेर शहरातील झामी चौक भागातील पवन चौक मधील बोरसे गल्लीतील एका बंदीस्त घरात तसेच महेंद्र महाजन यांचे राहते घरात दि.१० जानेवारी रोजी दुपारी ४.३० ते ६.३० वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता महेंद्र सुदाम महाजन रा.पाटील कॉलनी हा व त्याचे साथीदार जयंत गणेश पाटील, फिरोजखान नसीमखान पठाण तसेच महाराष्ट्र व राज्याच्या बाहेरील बुकी साई सचिन, डि के शहादा, प्रल्हाद, सुशिल, बंटी, धनजंय, भवानी पटणाराम, मुकेश शेठ, प्रकाश शेठ, मनोज, अँन्थोनी, प्रायव्हेट, नरेश, राजधानी, राजु व अन्य अज्ञात आरोपीनी संगनमत करुन kubermatka.com या नावाची वेबसाईट बनवुन शासनाने परवानगी दिलेली नसतांना लोकांची दिशाभुल व फसवणुक करत अवैध जुगाराचा खेळ खेळण्यासाठी त्या वेबसाईटवर मो क्र. ९८६०१५१५४७ वर व्हॉटसअँप द्वारे बोलुन त्याचे विश्वासु साथीदारांचे वेगवेगळ्या बँकाचे अकाऊंटवर पैसे स्विकारुन त्या मोबदल्यात लोकानां सट्टा खेळण्यासाठी आय.डी बनवून देत हार जीत करण्याचा जुगाराचा खेळ खेळत असत. जुगाराचा अड्डा चालवताना त्याचप्रमाणे playrajeshri.in या नावाची ऑनलाईन लॉटरी खेळुन व मिलन, कल्याण, बोम्बे, टाईम, राजधानी यासारख्या वेगवेगळ्या बनावट व शासनाची परवानगी नसलेल्या लॉटरीज व सट्टा बाजार वेबसाईटवर दाखवुन लोकांची फसवणुक करतानां मिळुन आले आहेत. महेंद्र सुदाम महाजन याने त्याचे अन्य हस्तकांकरवी लोकांना सावकारी परवाना नसतांना अवैध रित्या व्याजाने पैसे देवुन त्यांचे कडुन चेक , स्टँम्प सौदा पावत्या इ. घेवुन अवैध सावकारीचा गुन्हा केला आहे. तसेच महेंद्र सुदाम महाजन याच्याकडे बेहिशोबी ३,०७,६००/- रुपये, पैसे मोजण्याचे मशिन व्याजाच्या पैश्यांचे नोंदी असलेले वह्या व इतर कागदपत्रे असा एकून ३,८५,१००/- रुपये सह मुद्देमाल मिळुन आल्याने वरील नमुद आरोपाविरुध्द पोउपनि. शत्रुघ्न पाटील यांनी फिर्याद दिल्यावरुन भा.द.वि. कलम ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ म. जु. अँ. कलम ४ (अ) , ५ , सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १७, ३२, ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यांचा तपास पो. नि. जयपाल हिरे हे करीत असुन सदर मिळुन आलेल्या दोन आरोपीनां अटक करुन न्यायालया समोर हजर केले असता त्याची पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सावकारीचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांची वर्षानुवर्षे लुबाडणुक होत आहे. व्याज वसुली करीता काही सावकार गुंडाचा वापर करतात. तरी अवैध सावकारी बाबत कोणाला तक्रार द्यावयाची असल्यास त्यांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनशी सपंर्क साधावा असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशन कडुन करण्यात आले आहे. दरम्यान महेंद्र महाजन याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भावी नगराध्यक्ष नावाने शहरभरात बॅनर लागले होते. तसेच राजकीय वर्तुळात व कुबेर ग्रुपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढला होता. मात्र या कारवाईने आता राजकीय मनसुब्यांवर पाणी फिरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.