अमळनेर:- काल तहसीलदारांच्या पथकाने कारवाई करत अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे २ डंपर जमा केले आहेत.
अवैधरीत्या गौणखनिज मुरूम वाहतूक करणारे २ डंपर तहसीलदारांच्या पथकाला आढळून आल्यानंतर सदर दोन्ही डंपर अमळनेर पोलिस ठाण्यात मुद्देमालासह जमा केले आहेत. सदर पथकात तहसीलदार मिलिंद वाघ, तलाठी गणेश महाजन, विकास परदेशी, हर्षवर्धन मोरे, प्रथमेश पिंगळे, जितेंद्र पाटील, महेन्द्र पाटील यांचा समावेश होता.