अमळनेर:- तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून ग्रामीण भागातील मारवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत.
तालुक्यात काल ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ३५ वर पोहचली होती. त्यापैकी ७ रुग्ण काल कोरोना मुक्त झाल्याने आता तालुक्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या २८ आहे. मारवड पोलीस ठाण्यातील ७ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याने बहुतांश कर्मचारी होम क्वारंटाईन झाले असून काही खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.