यात वसंतनगर तांडा येथील गावातील रस्ते सिमेंट कांक्रेटीकरण, गटार, अंदाजित किंमत 10 लाख तसेच गावाची स्मशान भुमी पर्यंतचा सिमेंट रस्ता, बैठक शेड अंदाजित किंमत 5 लाख असे अनेक कामांचे वसंतनगर तांडा येथे आमदार पाटील यांच्या हस्ते भूमीपूजन झाले, याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रोहिदास दाजी, माजी पं.समिती उपसभापती चंद्रकांत पाटील, भोलाणे गावाचे सरपंच शिवा पाटील, पिंपळकोठा गावाचे सरपंच भैय्यासाहेब पाटील, उपसरपंच पिंपळकोठा नानाभाऊ पाटील तसेच वसंतनगर तांड्याचे सरपंच राजाराम उदेसिंग जाधव, उपसरपंच लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शाम रोहिदास जाधव, सदस्य पांडूरंग जसवंत जाधव, सदस्य रतिलाल जाधव, सदस्य केळकर जाधव, दरबार जाधव, मलखाण जाधव, माजी सरपंच छगन प्रयाग जाधव, चंद्रसिंग नाईक, परमा लालू जाधव, संतोष जाधव, रमेश जाधव, अरविंद जाधव, रंगलाल जाधव, पंडित जाधव, तसेच वसंतनगर तांड्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.
अमळनेर:-अमळनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या पारोळा तालुक्यातील वसंतनगर तांडा, तसेच भोलाणे, पिंपळकोठा येथे अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
तसेच मागील पंधरा ते वीस वर्षांपासून मागणी असलेला मुकटी रा.म. 6 ते भोलाणे, वसंतनगर, पिंपळकोठा, इंधवे, डांगर रस्ता डांबरी करण इजिमा .83 कि. मी ०/०० ते ७/०० सुधारणा करणे या कामाची अंदाजित किंमत 3 कोटी ऐवढा निधी आमदार अनिल पाटील यांनी मंजूर करून दिला असून या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मा सभापती अशोक नागराज पाटील, इंदवे चे मा सरपंच जितेंद्र पाटील,भोलाने चे पिंटू पाटील, माजी पं.समिती सभापती तसेच इंधवे गावाचे सरपंच प्रविण पाटील, माजी पं.समिती उपसभापती चंद्रकांत पाटील, मुकटी गावाचे सरपंच गुलाब दादा, भोलाणे गावाचे सरपंच शिवा पाटील, पिंपळकोठा गावाचे सरपंच भैय्यासाहेब पाटील, उपसरपंच पिंपळकोठा नानाभाऊ पाटील तसेच वसंतनगर तांड्याचे सरपंच राजाराम उदेसिंग जाधव, उपसरपंच लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शाम रोहिदास पाटील उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदारांनी पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत राज्य सरकार कडून मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेल तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरच शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन दिले आहे.