संस्थेची सन २०२२ ते २०२६ या कालावधीकरीता घेण्यात आलेली पंचवार्षिक निवडणुक गुप्त मतदान पध्दतीने रविवार दि.०९ जानेवारी रोजी शैक्षणिक संकुलात पार पडली. यात ८३३ पैकी ७५० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तसेच दि. १० रोजी मतमोजणी करण्यात येवून निकाल घोषित करण्यात आला. अध्यक्ष पदासाठी जयवंतराव मन्साराम पाटील यांनी ७५० पैकी ५०५ मते मिळाली तसेच कार्यकारी मंडळ संदस्य मारवड स्थानीक मध्ये देविदास शामराव पाटील यांना ४७५ मते, सुरेश मन्साराम पाटील यांना ४५६ मते, मनोज हिमंतराव साळुंखे यांना ४४९ मते, साहेबराव नारायण पाटील यांना ४४९ मते, युवराज काशिनाथ पाटील ४३२ मते मिळाली. तसेच कार्यकारी मंडळ सदस्य मारवडजवळील परीसराकरीता महारू रामदास शिसोदे यांना ४६४ मते चंद्रकांत रामराव शिसोदे यांना ४५६ मते, सुरेश भिमराव शिंदे यांना ४५४ मते, देविदास बारकु पाटील यांना ४४९ मते, तर लोटन शिवदास पाटील यांना ४४३ मते मिळाली असुन सहकार पॅनलचे सर्व उमेदवार निवडुन आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैजनाथ धनावळे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी एल जे चौधरी यांनी कामकाज पाहिले तर त्यांना प्रा.देवदत्त पाटील व सचिन पाटील यांनी मदत केली. निवडुन आलेल्या उमेदवारांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
अमळनेर :- तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल मतदान झाले होते. आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात सहकार पॅनलचे संपूर्ण उमेदवार निवडुन आले आहेत. तर अध्यक्षपदी पुन्हा एकदा जयवंतराव पाटील विराजमान झाले आहेत.