अखेर महसुल विभागाला कारवाईसाठी सापडला मुहूर्त…
अमळनेर:- तालुक्यातील शहापुर येथे पांझरा नदी पात्रातून वाळू वाहून नेणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडत मारवड पोलीस ठाण्यात जमा केले आहे.
दि. ५ सप्टेंबर रोजी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहापुर येथील पांझरा नदी पात्रातून वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आढळल्याने ते पकडण्यात आले. सदर ट्रॅक्टर एक ब्रास वाळूसह मुद्देमालासह पोलीस स्टेशन मारवड येथे जमा करण्यात आला आहे. सदरची कारवाई मंडळ अधिकारी सुरेश आर. बोरसे, तलाठी जितेंद्र ए. जोगी, कोतवाल वासुदेव तिरमले, कोतवाल आधार सोनवणे यांनी केली आहे.
अखेर महसूल विभागाला सापडला कारवाईचा मुहूर्त…
मागील काळात वाळू वाहतूकीत मोठ्या प्रमाणावर पाणी मुरत होते. रात्री अपरात्री चारचाकी गाडीत फिरून मलिदा गोळा होवून त्याचे वाटे हिस्से पडत असे चित्र होते. त्यातून अनेकांनी आपली जबरदस्त कमाई करत जंगम मालमत्ता विकत घेतल्या आहेत. आता चार महिन्यांपासून नवा भिडू नवे राज्य आले असले तरी अवैध वाळू वाहतुकीवर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र कायम होते. मात्र आता झालेल्या या कारवाईमुळे महसूल विभागाला कारवाईचा मुहूर्त सापडला आहे असेच म्हणता येईल.