अमळनेर : तालुक्यातील पळासदळे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला मोटरसायकलवर फिरवून तिचा विनयभंग करणाऱ्या सारबेट्याच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
पळासदळे येथील १३ वर्षीय शिक्षण घेणाऱ्या एका मुलीला सारबेटा येथील भुऱ्या व साहिल यांनी ओळखीचा फायदा घेत ९ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान बसस्थानकावरून मोटरसायकल वर बसवून तिला फिरवण्याच्या उद्देशाने धार येथील टेकडीवर नेऊन तिचा जबरदस्तीने विनयभंग केला. मुलीच्या फिर्यादीवरून साहिल व भुऱ्या या दोघांविरुद्ध विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे करीत आहेत.