
खान्देश शिक्षण मंडळ संचलित शाळांमधील अनियमित मान्यतेबाबत तक्रारीची घेतली दखल…
अमळनेर:- शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट दिल्यानंतर अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत. अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचालित शाळांमधील अनियमित मान्यतेबाबतचे प्रकरण उघड होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. आयुक्त सुरेश मांढरे यांनी पहिल्यांदाच गुरुवारी 7 सप्टेंबर रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला भेट दिली. त्यात त्यांना अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्याने त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. तसेच कठोर शब्दात खरडपट्टी काढली.

खान्देश शिक्षण मंडळ अमळनेर संचलित शाळांमधील अनियमित मान्यतेबाबतही लोटन चौधरी यांनी तक्रार केली आहे, याचीही शिक्षण आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. या खान्देश शिक्षण मंडळ संचलित उच्च माध्यमिक शाळांमध्ये कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून रद्द केलेल्या एनओसी व परत पाठवलेल्या प्रस्तावावर पगार काढणे तसेच शिक्षकांच्या कायम विनाअनुदानित प्रस्ताव नसताना मान्यता देणे व नंतर अनुदानित वर मान्यता देणे एनओसीसाठी कोणत्याही प्रस्ताव नसताना खोटी कागदपत्रे जोडून मान्यता देणे शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी सुनावणी मध्ये रद्द केलेली मान्यता, उच्च न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना पगार वाढवणे आधी बाबींसंदर्भात तक्रार केली आहे. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षणाधिकारी यांनी अनियमितपणे मान्यता दिल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक नाशिक व अन्य अधिकारी यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे. दरम्यान पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांच्या सह प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी डायटचे प्राचार्य वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांची आढावा बैठक आयुक्तांनी घेतली आहे, त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.