अमळनेर:- तालुक्यात काल ९ कोरोना बाधीत आढळले असून यात ८ रुग्ण शहरातील तर एक रुग्ण ग्रामीण भागात आढळून आला आहे.
शहरातील आठ पैकी सहा रुग्ण हे आधीच्या बधितांच्या संपर्कातील असून प्रताप मिल कॅम्पौंड व ओम शांती नगर भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तसेच ग्रामीण भागातील एक रुग्ण खाजगी लॅब मध्ये टेस्ट केल्यानंतर बाधित आढळून आला आहे. त्यामुळे एकंदरीतच शहरासह ग्रामीण भागात ही संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा परत विसर पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठेत, दुकानात तसेच अनेक शासकीय व खाजगी कार्यालयात कार्यालयात विनामास्क येणाऱ्याची संख्या अजूनही लक्षणीय आहे.