भारतीय कम्युनिस्ट पक्ष व परिसरातील ग्रामस्थांनी दिले निवेदन…
अमळनेर:- तालुक्यातील कुऱ्हे शिवारातील रेल्वे बोगदा रद्द करून उड्डाणपूल बांधण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
दिनांक २० सप्टेंबर रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व परिसरातील ग्रामस्थांनी निवेदन दिले असून उपविभागीय अधिकारी, मंत्री अनिल पाटील, पी आय विजय शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग जळगावचे अधिक्षक अभियंता यांना ही निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे व केंद्रीय रेल्वेमंत्री यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.
कुऱ्हे शिवारातील रेल्वेगेट जवळील बोगदा रहदारीसाठी केलेला बोगदा हा वाहतुकीसाठी सुरक्षित नसून त्याठिकाणी रात्री चोऱ्या, दरोडे, घातपात होण्याची शक्यता आहे. हा बोगदा पूर्णपणे असुरक्षित असून ते काम स्थगित करून उड्डाणपुलाचे कामासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देतेवेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील, तालुका सेक्रेटरी कॉम्रेड वाल्मिक मैराळे , कुर्हे खु.सरपंच कॉम्रेड निलाबाई भिल, कॉम्रेड शरफराज शाह मनसूर, कॉम्रेड शाम अधिकार पारधी, कॉम्रेड नारायण मैराळे, सुनील शिरसाठ, अजय भिल आणि ग्रामस्थ निवेदन देतेवेळी हजर होते.