अमळनेर:- तालुक्यातील वाघोदा – निसर्डी गृप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी निसर्डी येथील राजमल बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सोसायटीच्या चेअरमन निवडीसाठी नुकतीच कार्यकारी मंडळाची सभा घेण्यात आली. यावेळी कपुरचंद पाटील, आसाराम पाटील, आधार पाटील, यशवंत पाटील, लक्ष्मण पाटील, संजय पाटील, विशाल पाटील, जिजाबराव पाटील,केशरबाई बैसाणे, निसर्डीचे माजी सरपंच भिका पाटील, मोहन पाटील, राकेश पाटील,भुषण पाटील, गुलाब पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले.तर त्यांना सचिव रवि पाटील,बापु पाटील यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित चेअरमन राजमल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.