
राजे शिवाजी ग्रुपने राबविला सामाजिक उपक्रम…
अमळनेर:- तालुक्यातील प्र.डांगरी येथे राजे शिवाजी ग्रुपने गणेशोत्सवातून उरलेल्या रकमेतून जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले.

राजे शिवाजी ग्रुपतर्फे दरवर्षी गणेशोत्सव साजरा गेला जातो व त्यात विविध सामाजिक उपक्रम राबिवले जातात. यावर्षी बँड किंवा डिजे न लावता उरलेल्या रकमेतून गावातील मराठी शाळेत शिकणारे सर्व मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा निर्णय घेतला. काल गावातील जि.प.प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापक किशोर खंडेराव मगर व शिक्षीका उषा किशोर मगर, सुनीता तुकाराम पाटील यांच्यासह राजे ग्रुपचे सदस्य महेश शिसोदे, स्वप्निल शिसोदे, निखिल शिसोदे, अमोल शिसोदे, उत्कर्ष शिसोदे, नरेश बडगुजर, दिनेश पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

