अमळनेर:- तालुक्यात काल १५ कोरोना बाधीत आढळले असून सर्व रुग्ण शहरातील आहेत.
तांबेपुरा ३, भालेराव नगर १, मिल चाळ २, ओम शांती नगर १, लक्ष्मी नगर १, भालेराव नगर २, प्रताप मिल कँपाऊंड २, सप्तश्रृंगी कॉलनी १, गलवाडे रोड १, सुरभी कॉलनी १ असे एकूण १५ रुग्ण आहेत. त्यामुळे तालुक्यात संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरत असून एकूणच रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्क व सामाजिक अंतर राखणे या उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.