खा. शि. निवडणुकीबाबत याचिकेची औरंगाबाद खंडपीठात झाली सुनावणी…
अमळनेर:- तालुक्यातील खा. शि. मंडळ निवडणूक प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात जलदगती न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी काल दुपारी २:३० वाजता त्यावर सुनावणी झाली.
खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीच्या बाबतीत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालात आधी झालेली प्रक्रिया नव्याने राबविली जाणार नाही. नवीन नामांकन दाखल करणे, छाननी, माघारी,चिन्ह वाटप ही प्रक्रिया राहणार नसून ज्या स्थितीत निवडणुकीला स्थगिती मिळाली, त्यापासून पुढची प्रक्रिया सुरू राहील. म्हणजे फक्त मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. परंतु कोविड ची परिस्थिती बघूनच हा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांनाच असून ते परिस्थिती बघुन पुढील प्रक्रियेला परवानगी त्यांच्या मार्फत मिळेल, असे न्या. गंगापूरकर यांनी सांगितले. हेमंत पवार यांच्याकडून ऍड. महेश देशमुख आणि कल्याण पाटील यांच्याकडून ऍड. भरत वर्मा यांनी काम पाहिले.