स्व. डॉ अब्दुल कलाम यांच्या मूळ निवासस्थानी होणार कार्यक्रम…
अमळनेर:- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी “डॉ कलाम फिरती प्रयोगशाळा” तयार करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन (स्व) डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम (तामिळनाडू) येथील मूळ निवासस्थानी या मोबाईल व्हॅनचे रविवारी (ता.15) इस्रोचे चेअरमन डॉ एस सोमनाथ यांच्या हस्ते राष्ट्रीय पातळीवर उद्घाटन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प भारतभर दुर्गम भागातील शाळांसाठी राबविण्यात येणार असून विज्ञानासोबत रोबोटिक्स आणि व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला जाणार आहे.
स्वर्गीय डॉ कलाम यांचे नातू एपीजेएमजे शेख सलीम, डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फौंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह देशातील नामवंत शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रमधून आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, सायंटिस्ट डॉ दिलीप देशमुख, मिलिंद चौधरी, राजकुमार भामरे, मेघश्याम पत्की, प्रिया ठाकूर, संदीप वारजे, मिल के चलोचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, डॉ एपीजे अब्दुल कलाम फाऊंडेशनच्या राज्य समन्वयक मनीषा चौधरी, देवेंद्र साळुंखे, आशिष चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहतील. दरम्यान आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली फिरती प्रयोगशाळा ही मारवड परिसर विकास मंच व मिल के चलो असोसिएशन यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार करीत आहे. हा प्रकल्प सुरुवातीला शाळांमधे राबवण्यासाठी नागपूर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार, डी ए धनगर, निरंजन पेंढारे, दत्तात्रय सोनवणे, चंद्रकांत पाटील, जयदीप साळी, विजय मोरे यांच्यासह उमेश काटे यांचे सहकार्य मिळत आहे.