
नोकरी मार्गदर्शक निंबा पाटील यांनी विविध कोर्सची माहिती देत केले मार्गदर्शन…
अमळनेर:- युवतींनो तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील रहा, आपल्या पदरी जे आले आहे, ते घट्ट पकडून ठेवा. अपेक्षित यश आपोआप मिळाल्याशिवाय राहत नाही, असे मत नोकरी मार्गदर्शक निंबा पाटील (मुंबई) यांनी व्यक्त केले.

अमळनेर येथील रुख्मिणीताई कला, वाणिज्य महिला महाविद्यालयात करिअर कट्टा अंतर्गत “नोकरी मार्गदर्शन मेळावा” प्रसंगी “खाजगी क्षेत्रातील, देश – विदेशातील नोकरीच्या संधी” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस.जे. शेख उपस्थित होते. यावेळी नोकरी मार्गदर्शिका वैष्णवी डोरलिकर (नागपूर), डॉ. मयुरी जोशी, स्पर्धा मार्गदर्शक उमेश काटे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम सत्रात वैष्णवी डोरलिकर यांनी विविध कोर्सची माहिती देवून युवतींनी आपल्या पायावर कसे उभे राहावे, याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात स्पर्धा उमेश काटे यांनीही समयोचित मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनीनी सतत प्रयत्नशील राहून आई – वडिलांचा तसेच महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. तसेच चार विद्यार्थ्यांनीना नोकरी उपलब्ध करून दिली त्याबद्दल माहिती दिली व त्यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. मयुरी जोशी यांनी मोफत आरोग्य व रक्तगट तपासणी केली. यावेळी करिअर संसदेचे मंत्रिमंडळ नियुक्त करण्यात आले. विद्यार्थिनी मुख्यमंत्री म्हणून सुवर्णा निक्षे,तर इतर प्रतिनिधी म्हणून श्रद्धा देशमुख, ऋतुजा येवले,आकांक्षा पाटील,लीना पाटील,रेखा पावरा यांची निवड करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनि मोठया प्रमाणात उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सुनील वाघमारे यांनी मानले. यावेळी प्रा इंद्रायणी सैंदाणे, प्रा डॉ अमोल दंडवते, प्रा जयश्री साळुंके, प्रा डॉ सारिकाबेन पाटील, प्रा चारुशिला ठाकरे, प्रा डॉ हुकुमचंद जाधव, प्रा डॉ मंजुषा खरोले, आदी सह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डी बी गोलाईत, लक्ष्मण बोरसे, आशा पाटील, रमेश चव्हाण, सरिता बोरसे यांनी सहकार्य केले.

