अमळनेर:- राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ ३ ऐवजी साडे पाच वाजेपर्यंत करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के सुर्यकृष्णमूर्ती यांनी दिले आहेत.
राज्यात २३५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. १६ ते २० ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती. मात्र पहिल्या दिवशी वेबसाईट चालत नसल्याने उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत. तसेच विविध कागदपत्रे व माहिती गोळा करत विलंब होत आहे. आणि मोजक्याच ठिकाणी अर्ज भरले जात आहेत. त्यामुळे गर्दी होते. त्यात साईट बंद पडल्यास अडचणी येतात. म्हणून निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणुका होण्यासाठी तसेच कोणीही उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत दुपारी ३ ऐवजी ५:३० पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी महाऑनलाईनने दूर केल्या आहेत.