विजेत्या व सहभागी स्पर्धकांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जि.प. शाळेत स्व. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच आशाबाई भील, उपसरपंच भिकन भालेराव पाटील, माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, हरिभाऊ मारवडकर, हर्षल भिकनराव पाटील, हेमकांत साळुंखे, प्रकाश पाटील, इच्छापुरकर अप्पा आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी माजी राष्ट्रपती स्व. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वत्कृत्व स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. ३१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत प्रथम क्रमांक जान्हवी हेमकांत साळुंखे, द्वितीय क्रमांक मृणाली भूषण साळुंखे, तृतीय क्रमांक रोशनी किरण शिंदे, उत्तेजनार्थ बक्षीस माहेश्वरी रवींद्र साळुंखे ,प्रज्ञा दिग्विजय साळुंखे यांनी पटकावला. यावेळी प्रमुख मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत मारवड जिल्हा परिषद शाळेत राबविले जाणारे असे उपक्रम विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविणारे ठरत असून त्यामुळे जिप शाळेकडे विद्यार्थी आणि पालकांना ओढा वाढला आहे, असे मत व्यक्त केले. यात बक्षीस पटकावणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना वही भेट देण्यात आली. सायन्स कॉलेजचे सचिव हर्षल भिकनराव पाटील यांनी कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च उचलला. मान्यवरांनी त्यांच्या दातृत्वाचे ही कौतुक केले. मुख्याध्यापक मोरे व सर्व शिक्षकवृंदानी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.