२९ रोजी नूतन भक्तनिवास, पांझरा नदीवरील पादचारी पूल व स्वामी हंसानंद घाटाचे होईल लोकार्पण…
अमळनेर:- खान्देशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तापी पांझरा संगमावरील पुरातन कालीन श्रीक्षेत्र कपिलेश्वर तीर्थक्षेत्रावर विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जिल्ह्यातील तिन्ही मंत्रांच्या उपस्थितीत दिनांक २९ रोजी सकाळी १० वाजता कपिलेश्वर मंदिर संस्थानकडून “कपिला गोशाळा” प्रांगणात आयोजित केला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राहणार असून नूतन भक्तनिवासाचे लोकपर्ण मदत व पुनर्वसन मंत्री अनील पाटील करतील तर पांझरा नदीवरील पादचारी पुलाचे लोकार्पण पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे करतील तर स्वामी हंसानंद घाटाचे लोकार्पण माजी पर्यटन मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी व भाविक संत मंडळीसह अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
श्रीक्षेत्र त्रिपिंडी कपिलेश्वर मंदिर संस्थानकडून विविध विकास कामे लोकसहभागातून व लोकवर्गणीतून करण्यात आली आहे तर बाकीच्या विकास कामांना शासनाच्या लोकोपयोगी निधीतून करण्यात आली आहेत. त्या कामांचा लोकार्पण सोहळा मंदिर संस्थानकडून रविवारी आयोजित करण्यात आला असून यासाठी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील संत मंडळी, तीर्थक्षेत्र मंदिर विकास समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून यासाठी विशेष अतिथी म्हणून खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, माजी मंत्री खासदार सुभाष भामरे, माजी खासदार वसंतराव मोरे , धुळ्याचे आमदार कुणाल पाटील ,शिरपूरचे आमदार कांशीराम पावरा, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार स्मिता वाघ, मा.आ. साहेबराव पाटील, मा.आ. शिरीष चौधरी, सुधीर तांबे, रामकृष्ण पाटील, उपायुक्त उन्मेष महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , प्रांत अधिकारी महादेव खेडकर, अमळनेर व शिंदखेडा येथील तहसीलदार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, तापी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता बोरकर, अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी आणि दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विविध धार्मिक स्थळांचे संस्थांनचे अध्यक्ष, अमळनेर तालुक्यातील तापी बोरी व पांझरा पट्यातील, पाडळसरे निम मुडावद परिसरातील भजनी मंडळ, स्वयंसेवक आदींच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येणार असून भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कपिलेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष महामंडलेश्वर हंसानंद महाराज, सचिव मघन पाटील, उपाध्यक्ष सी एस पाटील व मंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळाने केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निम, मुडावद, पाडळसरे,कळमसरे, शहापूर, पढावद, मारवड, म्हळसर,तांदळी येथील ग्रामस्थांनी हिरीरीने सहभागी होत कार्यक्रमस्थळी स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहेत.