अमळनेर:- शहरात रामवाडी परीसरातील सुरु असलेल्या कै.श्री. दादासाहेब व्हि एस पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये दि. २१ रोजी चिमुकल्यांचा दांडीया महोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
या प्रसंगी पूर्व प्राथमिक ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी सुध्दा आनंदाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरवात संस्थेच्या सचिव अलका पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर दुर्गामातेची मनोभावे आरती व पूजन करण्यात आले. आरतीचा मान शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा सोहिते व सर्व शिक्षक वृदांना देण्यात आला. विद्यार्थ्यांनी सुंदर गरबा नृत्य सादर करून उपस्थित नागरिक आणि पालकांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका योगिता फाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका स्वाती चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनीषा सोनार, पल्लवी येवले, मनिषा शिरसाठ,संगीता पाटील ,सुवर्णा पाटील, योगिता पाटील ,भारती गव्हाणे(शिपाई)
यांनी मेहनत घेतली. त्यांना सचिव अलका पवार आणि मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.