जायँट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली यांचा सामाजिक उपक्रम…
अमळनेर:- शहरातील जायँट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली यांच्याकडून नवरात्री निमित्त गरजू लोकांना नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
दिनांक २२ रोजी जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेलीचे अध्यक्षा दिपिका सोनवणे, उपाध्यक्ष रूपाली पवार व सोनाली पाटील, सचिव शोभा पाटील, संचालक सुनीता बी पाटील, मेघा शिसोदे, सुदर्शना पाटील व नूतम कदम उपस्थित होत्या.
दसऱ्यानिमित्त शासकीय आय टी आय कॉलेज जवळील वस्तीत गरजू लोकांना मदत म्हणून साड्या, लहान मुलांचे कपडे, तरुण तरुणींचे तसेच पुरुषांचे एकूण ८०० कपड्यांचे वाटप करत नवरात्रीची आठवी माळ वस्तीतील लोकांसोबत आनंदात साजरी केली. दिपिका सोनवणे यांनी महिला व मुलींशी हितगुज साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व वेळोवेळी येणाऱ्या अडचणींवर सहकार्याची भावना दाखवली व गरजेप्रमाणे त्या अडचणींसाठी मदत करण्याचा शब्द देत तेथील देवीचे दर्शन घेऊन वीरांगना सहेलीने हा सामाजिक उपक्रम पूर्ण केला.