अमळनेर:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष नाना पटोले यांची शनिवारी दि. २८ रोजी रात्री ८ वाजता अमळनेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौकात जाहीर सभा आयोजित केली आहे.
आगामी सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाना पटोले यांचा अमळनेर दौरा होत आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आव्हान अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, कॉंग्रेसचे जेष्ठनेते डॉ. अनिल शिंदे तसेच सर्व काँग्रेस फ्रंटलचे व सेलचे अध्यक्ष यांनी केले आहे.