स्वतःच्या शेताच्या बांधावर झाडाला दोरीने घेतला गळफास…
अमळनेर:- तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील जयेश शरद पाटील (वय २३) या तरुणाने त्याच्या स्वतःच्या शेताच्या बांधावर चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. मुरलीधर आनंदा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील अगोने करीत आहेत.