सभेला उपस्थित राहण्याचे मराठी वाङमय मंडळाने केले आवाहन…
अमळनेर:- येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींची सभा २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सानेगुरुजी हायस्कुल, अमळनेर येथे एस. एम. गोरे सभागृहात ही सभा होईल. या सभेत मंडळाचे पदाधिकारी दुपारी १ ते ४ पर्यंत समक्ष भेटीसाठी उपस्थित राहून संमेलनाबाबत हितगुज करणार आहेत. अमळनेर शहरातील सुप्रसिध्द मराठी वाङमय मंडळातर्फे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३, ४ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे होत आहे. जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक हा पट्टा खानदेशचा परिसर म्हणून ओळखला जातो. आता खऱ्या अर्थाने साहित्य संमेलनाच्या कामकाजाला सुरुवात झाली असून विविध समित्यांमार्फत संमेलनाचे कामकाज होणार आहे. म्हणून तमाम खानदेशवासी, साहित्य प्रेमी, सामाजिक, सांस्कृतीक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात स्वतःहून मदत व सहकार्य करणार्या सन्माननीय नागरीकांना विनंती आहे की, संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या सन्माननीय साहित्यप्रेमींनी आपले पूर्ण नांव, गांव, पत्ता दि. २/११/२०२३ पर्यंत मान, अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ या नावाने लेखी कळवावे अथवा व्हॉटस्अॅपवर कळवता येईल, यासाठी प्रा.डॉ. सुरेश माहेश्वरी यांच्या ८८६०७१११९९ या मोबाईल नंबर कळवावे. यासाठी दि. २/११/२०२३ रोजी एक समंत्रण सभा सानेगुरुजी हायस्कुल, अमळनेर येथे एस. एम. गोरे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मंडळाचे पदाधिकारी दुपारी १ ते ४ पर्यंत आपल्या समक्ष भेटीसाठी उपस्थित राहून संमेलनाबाबत हितगुज करणार आहेत. या सभेत सर्वांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, कार्यवाह सोमनाथ ब्रम्हे यांनी केले आहे.