फारकत झाली नसताना केले दुसरे लग्न, मारवड पोलिसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील लग्नात मानपान दिला नाही म्हणून विवाहितेला मारहाण करत फारकत झाली नसताना दुसरे लग्न केल्याने मारवड पोलिसात विवाहितेने तक्रार दाखल केली आहे.
मंगलबाई वडार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. १९/०२/२००७ ते २४/१०/२०२१ या काळात वावडे येथे लग्नात पाहुण्यांना मानपान दिला नाही या कारणावरून पती प्रशांत वडार, सासू मीराबाई वडार, कल्पनाबाई वडार, शेखर वडार, सुरेखा वडार यांनी काहीना काही कारणावरून फिर्यादी महिलेला मारहाण केली असून कायदेशीर फारकत झाली नसताना ही महिलेच्या पतीने दुसरे लग्न केले असल्याचे नमूद केले आहे. त्यावरून वरून पाच जणांविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम ४९८, ४९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.हे. कॉ. भटुसिंग तोमार हे करीत आहेत.