मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असलेल्या पार्थिवावर केले अंत्यसंस्कार…
अमळनेर:- मराठा आंदोलनाकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा समाजाने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तहसील आवाराच्या बाहेर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असे तिघांचे फोटो असलेल्या पार्थिवास लाथा मारत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरकार मेले आहे अशा विविध घोषणा देत मराठा बांधवांनी तिरडी तयार करून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असे तिघांचे फोटो लावले होते. वाजत गाजत अंत्ययात्रा आंदोलन स्थळावरून तहसील कार्यालयाच्या आवारात नेऊन पुन्हा बाहेर रस्त्यावर आणून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन लाथांजली अर्पण करण्यात आली. आग्या झालेल्या डॉ अनिल शिंदे यांनी अग्निडाग दिला. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील, रणजित शिंदे, मनोहर निकम, सचिन पाटील, शिवाजी पाटील, के डी पाटील, डी एम पाटील, शरद पाटील, विजय पाटील, घनश्याम पाटील, अनंत निकम , बी के सूर्यवंशी, राजश्री पाटील, अरुण देशमुख, ॲड दिनेश पाटील, कल्याण पाटील, किरण पाटील, जितेंद्र देशमुख, राजेंद्र देशमुख, नावेद शेख, दर्पण वाघ, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, सनी पाटील जयवंतराव पाटील, शीतल सावंत सहभागी झाले होते.