अमळनेर:- येथील अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेल्या आंदोलनाला निवेदन देत पाठिंबा दिला आहे.
अमळनेर पंचायत समिती आवारात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाने उपस्थित राहत लेखी पाठिंबा दिला आहे.यावेळी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील उपस्थित होते.दरम्यान संपूर्ण राज्यभर मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटले असून अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने राज्यभर वातावरण चिघळत आहे. नागरिकांचे हक्क व सुरक्षितता अबाधित ठेवणे हे सरकारचे कर्तव्य असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात सलोखा टिकून राहण्यासाठी ह्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष जितू ठाकूर, सचिव चंद्रकांत पाटील, संजय पाटील,किरण पाटील, महेंद्र रामोशे, मुन्ना शेख, आर जे पाटील, गणेश पाटील, महेंद्र पाटील, संभाजी देवरे, विजय पाटील, युवराज पाटील, विकी जाधव, अनिल पाटील, सदानंद पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.