अमळनेर:- तालुक्यातील फापोरे बु येथील जिल्हा परिषद शाळेत पंचायत समिती अंतर्गत दीपोत्सव 2023 उपक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समावेशित शिक्षण समन्वयक श्रीमती सुषमा इंगळे, प्रमुख अतिथी शिक्षण विस्ताराधिकारी सुर्वे, केंद्रप्रमुख राजेंद्र गवते तसेच मुख्याध्यापक सुनील जाधव व्यासपीठावर उपस्थित होते. दिव्यांग मुलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तालुक्यातून फापोरे बुद्रुक या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अतिशय सुंदर विविध आकाराचे आकाश कंदील, पणत्या, दिवे तयार करण्यात आले. फक्त मुलांना वाव देण्यासाठी व आपल्यातील कौशल्य शोधण्याचा उत्तम नमुना कार्यशाळेतून मिळाला. सर्व दिव्यांग विद्यार्थी व पालक यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणून इयत्ता पहिलीतील विद्यार्थी दिनेश समाधान भिल हा स्वमग्न विद्यार्थी शाळा सुरू झाल्यापासून एक दिवसही अनुपस्थित न राहता अध्ययनक्षमता प्राप्त केल्या म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक राहुल चौधरी व श्रीमती शितल भदाणे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला असून सुनंदा पिंगळे, श्रीमती वरुडे, श्रीमती पाटील तसेच विषयशिक्षक तुषार बाविस्कर, देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, विशेष शिक्षक मोहन, महेंद्र पाटील, किशोर पाटील इत्यादी जण उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय पाटील तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती दिपाली पवार यांनी सहकार्य केले.