बाजार समितीचा कारभार शेतकरी हिताचा व पारदर्शकपणे सुरू:- मंत्री अनिल पाटील…
अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांची जन्मदिवसाच्या निमित्ताने वहीतुला करण्यात आली,यावेळी मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती, उपसभापती संचालक मंडळांने अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची व विमा देण्याची केलेली मागणी राज्याचे आपत्ती व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी लवकरच मंडळनिहाय पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देत बाजार समितीचा कारभार शेतकरी हिताचा व पारदर्शकपणे सुरू असल्याचे सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने बाजार समितीचे उपसभापती संचालक मंडळ व्यापारी, गुमास्ता हमाल, मापाडी व कर्मचारी वृंद यांच्यावतीने अभिष्टचिंतन समारंभात वहीतुला करण्यामागे सदरच्या वह्या गरीब, गरजू विद्यार्थ्याना ज्ञानार्जनासाठी वाटप करण्याच्या उद्देशाने याप्रसंगी वहीतुला करण्यात आली.
मा.आ.कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती बाबत उपायोजना करण्याचे नामदार पाटील यांच्याकडे थेट मागणी केली तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक डॉ.अनिल शिंदे, समाधान धनगर, पुष्पलता पाटील, सुषमा देसले, भाईदास भिल, प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख आदींनी अवर्षणप्रवण अमळनेर तालुक्यात अनियमित पडलेला पाऊस,पिकांचे झालेले नुकसान,या पार्श्वभूमीवर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, व शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा या मागणीचे निवेदन दिले. यावेळी बोलतांना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यात मंडळनिहाय दुष्काळ जाहीर करण्याबाबत व विमा देण्याबाबत दिवाळीपर्यंत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार शेतकरी हिताचा सुरू असून पारदर्शक व उत्तम सुरू असल्याने बाजार समितीत लवकरच कोल्ड स्टोरेज शेतकरी भवन व शेतकऱ्यांना दर्जेदार जेवण देण्याची व्यवस्था करण्याची संचालक मंडळाची मागणी ही लवकरच पूर्ण करू, असे आश्वासन दिले. खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ.अनिल शिंदे, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील,बाजार समितीचे कर्मचारी गणेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करून अशोक पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन अर्बन बँक संचालक रणजित शिंदे यांनी केले. यावेळी मंचावर युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, पाडळसरे धरण समितीचे सुभाष चौधरी, खा.शि. मंडळ संचालक हरी वाणी,प.स.चे मा.सभापती श्याम अहिरे, प्रा. सुरेश पाटील, एल.टि. पाटील मान्यवर उपस्थित होते.सत्कारास अशोक पाटील यांनी उत्तर देताना, कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताचे जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्राधान्य असून ना.अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीत कोल्ड स्टोरेज, शेतकरी निवास भवन व शेतकऱ्यांसाठी दर्जेदार जेवण या मूलभूत सुविधा तातडीने निर्माण करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले.
कृ.उ.बा संचालक प्रा.सुभाष पाटील, नगरसेवक संजय पाटील, प्रताप शिंपी,महेश पाटील, गटविकास सचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील,योगेश महाजन, पंकज वाणी, रा.कॉ. महिला अध्यक्षा मंदाकिनी भामरे, बाळू पाटील,सुनिल शिंपी, शब्बिर पहिलवान, ढेकू चेअरमन निळकंठ पाटील, सदाबापू पाटील, प्रफुल पाटील,अंबु पाटील आदींसह कृ उ बा संचालक प्रफुल पाटील,हिरालाल पाटील,समाधान शेलार, मुख्याध्यापक चंद्रशेखर व्यास, आशिष पवार, प्रशांत मराठे, समाधान शिंदे यांनीही कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थिती देत शुभेच्छा दिल्यात. तर साईगजानन मंडळ, पाडळसरे धरण जनआंदोलन समिती, व्यापारी असोसिएशन, गुमास्ता व हमाल मापाडी संघटना, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश राठोड व कर्मचारी वृंद, अमळनेर शहर व तालुक्यातील पत्रकार बांधव, लोण ग्रुप ग्रामस्थ व युवक मंडळ, सरस्वती विद्या मंदिर, सौ विमलबाई आधार पाटील प्राथमिक विद्या मंदिर, स्व.दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय, चौबारी,स्व.स्मिता पाटील शिक्षण संस्था संचलित सौ. पदमकोर जमादार माध्य. आश्रमशाळा, कै.दि.पाडवी प्राथमिक आश्रम शाळा जळोद शिरपूर, माध्यमिक विद्यालय विसरवाडी, नवापूर, यांच्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी अशोक पाटील यांचा सामूहिक सत्कार केला.