अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथे डीवायएसपींच्या पथकाने छापा टाकून सट्टा घेणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पीएसआय विलास पाटील, हेकॉ भटू तोमर, हेकॉ मेघराज महाजन, पोना प्रमोद बागडे, पोकॉ हितेश बेहेरे, पोकॉ गणेश पाटील यांच्या पथकाने तालुक्यातील अमळगाव येथे छापा टाकून नागरिकांकडून सट्टा घेणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडले. यात निलेश सुपडू भील (वय २७) याचेकडून १२१० रुपये व सट्ट्याचे साहित्य, नारायण पारधी (वय ६२) याचेकडून ५१४० रू. व सट्ट्याचे साहित्य, व भाईदास पारधी (वय ५२) याच्याकडून ११७० रुपये व सट्ट्याचे साहित्य मिळून आले आहे. डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून मारवड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सुनील अगोने हे करीत आहेत.