अमळनेर:- गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस या दिवसापासून दिवाळी सुरू होते. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला असून, ती पूजनीय मानली गेली आहे. त्यानुसार येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात विधीवत सवत्स धेनू पूजन करण्यात आले.
दिनांक ९ रोजी वसू बारसचे औचित्य साधत मंदिरात मंत्रोच्चाराने अध्यक्ष डिगंबर महाले यांनी सपत्नीक गायीचे पाद्यपूजन करुन पूष्पमाला अर्पण केली व सौभाग्याचे अलंकार प्रदान करत नैवद्येही देण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डी. ए. सोनवणे, आशा महाले, सेवेकरी व्ही. व्ही. कुलकर्णी, पुजारी मंदार कुलकर्णी, पत्रकार बांधव उपस्थित होते.