” महाग पडी जाई भावड्या तुले हाई लाचनी मागणी”…
लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांची अहिराणी गीतातून जनजागृती…
अमळनेर:- नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी हाई झुमकावाली पोर या सुप्रसिद्ध अहिराणी गीताच्या चालीवर जनजागृतीपर अहिराणी गीत सादर केले असून महाराष्ट्रभर ते प्रसिद्ध झाले आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
अनिल बडगुजर हे जळगाव जिल्ह्यात अमळनेर, रामानंद नगर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक तर धुळे येथे लाचलुचपत विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते नाशिक येथे कार्यरत आहेत. त्यांना गायनाची आवड आहे. आपल्या कलेचा सामाजिक कार्यासाठी वापर करता येईल का ? याचा विचार करून त्यांनी ‛हाई झुमका वाली पोर..’ या गीताच्या चालीवर ‛हाई अँटी करप्शननी पोर लाचखोर ले पकडाले चालनी… महाग पडी जाई भावड्या तुले हाई लाचनी मागणी’ असे म्हणत जनजागृती केली आहे. “सरकारी कामाचा तू पगार घेतो, ते तुझे कर्तव्य आहे त्याचे तू पैसे घेऊ नको, गरिबांची तू हाय घेशील ते तुझे लेकरे आणि बाळे भोगतील”, अशा भावनिक शब्दात त्यांनी गीतातून जनजागृती केली आहे. सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यापैकी कोणी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत विभागाशी बिनधास्त संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी अहिराणी भाषेतून सुमधुर संगीताच्या चालीवर केल्याने या गीताची शासकीय दरबारी आणि अहिराणी भाषिकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. गीत रचना स्वतः अनिल बडगुजर यांनी केली आहे. गीतासाठी व्हिडीओ व चित्रीकरण एस कुमार यांनी केले आहे.