
अमळनेर :- तालुक्यात विविध शाळा, ग्रामपंचायती व शासकीय कार्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

उदय माध्यमिक विद्यालय झाडी ता.अमळनेर शाळेत 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण शाळेचे संचालक देविदास सखाराम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासो धनगर दला पाटील व संचालक मडळ तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अमळनेर येथील सायरादेवी बोहरा सेंट्रल स्कूल येथे प्रजासत्ताक दिन म्हणजेच 73 वा गणराज्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील माजी कॅप्टन शिवाजी पाटील व सैनिक श्री विनोद बिऱ्हाडे यांना बोलावण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र बोहरा,संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश बोहरा, संचालक आशिष बोहरा, संचालिका दिव्या बोहरा आणि शाळेचे प्राचार्या डॉ.मंजुळा नायर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये नृत्य स्पर्धा भाषण इत्यादी स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी मानसी पाटील हिने केले तर आभार सृजल पाटील ह्या विद्यार्थ्यांने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी परिश्रम घेतले.

आदर्श गांव सुंदरपटटी येथे विविध शासकीय कार्यालयात कोरोनाचे नियम पाळून प्रजासत्ताक दिनी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील हे होते. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय सुंदरपट्टी येथे गावाचे सरपंच सुरेश पाटील व माजी सरपंच सुरेखाबाई सुरेश पाटील या दोघांच्या हस्ते सपत्नीक ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातील माऊली सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते सन्माननिय विघन बळीराम पा. यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी जि.प. उच्च. प्रा.शा. सुंदरपट्टी येथील कार्यालयाचे ध्वजारोहण शाळेतील पदवीधर शिक्षक ( प्रभारी केंद्रप्रमुख फाफोरे बु.) विश्वास पाटीलसर, मुख्या. संजय जगतापसर, ज्येष्ठ शिक्षिका जयश्री बारड मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. स्मिता सोनवणे मॅडम या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी सर्व ग्रामस्थ, गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठीत नागरीक, ग्रा.प. पदाधिकारी, शा. व्य. स . अध्यक्ष, उपाध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी गावातील बचतगट अध्यक्ष, सर्व सदस्य तरुण मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्या. संजय जगताप सर यांनी केले. आभार विश्वास पाटील सर यांनी मानले.

तालुक्यातील सावखेडा येथे प्रथमच पती पत्नीला विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या दिनी ध्वजारोहण करण्याचा योग जुळून आला. या दुग्धशर्करा योगावेळी अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी महाजन यांची विशेष उपस्थिती होती.
सावखेडा ग्राम पंचायतीचे सरपंच हेमलता कदम यांनी ग्राम पंचायतीत ध्वजारोहण केले तर सरपंच यांचे पती हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष असल्या कारणाने त्यांना जिल्हा परिषद शाळेचा ध्वजारोहण करण्याचा सन्मान मिळाला. पत्नी सरपंच व पती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यामुळे ध्वजारोहण करण्याची सुवर्णसंधी दाम्पत्याला लाभली. ध्वजारोहण आधी संविधान प्रतीचे वाचन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक मनोज दहिवदकर, उपसरपंच लखन कदम,सदस्य अनिल नेरकर, संजय भिल, सदस्या लिलाबाई पाटील,निकिता कदम, शोभा अहिरे,प्रतिभा सोनवणे, संगणक परिचालक सागर मोरे, कर्मचारी रमेश सोनवणे, सुपडू अहिरे,तलाठी शिंदे, कोतवाल विलास अहिरे, शालेय मुख्याध्यापक, शिक्षक वृंद,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आशा स्वयंसेवीका, अंगणवाडी सेविका सह ग्रामस्थ उपस्थित होते.