
अमळनेर – येथील प्रताप मिलच्या कॉलनीतील गटारींचे सांडपाणी पुढे पार वाहून न जाता किमान ३ महिन्यांपासून गटारी तुंबल्यामुळे या भागातील २ हजार लोकसंख्येच्या वस्तीत कमालीची दुर्गंधी पसरली आहे.

डासांच्या वाढत्या प्रादुर्भामुळे येथील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सगळ्यांत आधी तर फॉगिंग मशिनद्वारा या भागात फवारणी करणे अनिवार्य आहे.
जुने प्रताप सायबर, आराधना किराणा दुकाना समोरील हा भाग नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्यात आला आहे. न.पा.च्या आरोग्य विभागाने उपरोक्त समस्या सोडवण्यावर आता तरी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे


