
यात्रोत्सवाची रचना मध्यभागी लावा,युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे यांचे निवेदन
अमळनेर-येथील बोरी नदी पात्रात होणाऱ्या संत सखाराम महाराज यात्रोत्सवात दोन्ही बाजूला पार्किंगची व्यवस्था करा आणि यात्रोत्सवाची रचना मध्यभागी लावा या मागणीचे निवेदन भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष देवा लांडगे यांनी न प च्या मुख्याधिकारी यांना दिले आहे.

यात म्हटले आहे की गेल्या २ ते ३ वर्षपासून यात्रोत्सवात होत असलेल्या पार्किंग व्यवस्थेवर शहरातील नागरीक व महिला नाराज आहेत.प्रामुख्याने अमळनेरची यात्रा ही रात्री 9 वा. पासून ते 1 वा. पर्यंत चालत असते. यात अमळनेर शहरातील व खेड्या-पाड्यावरील लोक लांबुन यात्रेसाठी येतात. यात पार्किंग व्यवस्था चुकीची व एकमेव असल्यामुळे नागरिकांना पार्किंग पानखिडकी, कसाली मोहल्ला, बौध्द वाडा, नदी पुलावर अश्या ठिकाणी लागत असते. त्यामुळे अंधाराचा फायदा घेवून काही गावातील मवाली मुले हे महिला व मुलींची छेळछाळ करत असतात. कोणी गाड्यांचे पेट्रोल चोरते, कुणी गाडया चोरतात, कुणी महिलांचे दागीणे चोरले जातात असे अनेक समस्यांना नागरीकांना सामोरे जावे लागते. तसेच यात्रेत पार्कीग रस्त्यावर असल्यामुळे वयोवृध्द महिला-पुरुष, लहान-लहान मुले, महिला वर्ग यांना पायी यात्रेत यावे लागते. त्यांना हा त्रास होवून नये म्हणून संपुर्ण लहान मोठे गाड्यांची पार्किंग व्यवस्था ही नदीपात्रात बजरंग व्यायाम शाळे समोरील जागेत करण्यात यावी. व मोठ्या गाड्यांची पार्किंग व निघण्याची व्यवस्था ही पैलाड भागाकडून करावी. तसेच सर्व मोठे झुले (पाळणे) हे पैलाड भागाकडे लावण्यात यावे. मागील वर्षी महाराजांनी सांगुन देखील पार्किंगच्या ठिकाणी ते लावण्यात आले.

तसेच नदीपात्रात पाण्याचे डबके साचल्यामुळे भाविकांना यात्रा फिरण्यास व डबे खाण्यास त्रास होतो. तरी वरील प्रमाणे समस्या सोडवून नागरिकांना निसर्गरम्य व त्रास मुक्त यात्रेचा आनंद द्यावा अशी अपेक्षा देवा पुंडलीक लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

