
कामगार दिनाचे औचित्य साधून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम…
अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कामगार सन्मान सोहळ्यात कष्टकरी हमाल मापाडी कामगारांना आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भेटवस्तू वाटप करण्यात आल्यात.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेले कष्टकऱ्यांच्या सन्मानाचा सोहळा व कष्टकरी यांचे हिताचे उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन यावेळी बोलतांना आ.अनिल पाटील यांनी केले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात प्रथम व विभागात तृतीय , राज्यात १७ व्या स्थानी आल्याने आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सभापती अशोक पाटील व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यशामध्ये संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी यांचेसह बाजार समिती आवारात घाम गाळणाऱ्या हमाल मापारी यांचे कष्टाचा वाटा मोलाचा आहे असे प्रतिपादन प्रास्ताविकात सभापती अशोक पाटील यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले.आभार संचालक भोजमल पाटील यांनी मानले.यावेळी मंचावर संचालक समाधान धनगर, हिरालाल पाटील,पुष्पा पाटील,भाईदास भील,प्रकाश अमृतकार, ऋषभ पारेख,शरद पाटील, माजी जि.प सदस्य ॲड व्हि आर पाटील, अनिल शिसोदे, जळगाव जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील आदींसह मान्यवर उपस्थितीत होते. महाराष्ट्र दिवस व कामगार दिनाच्या निमित्ताने याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेकडो हमाल, मापाडी तसेच अमळनेर नगर परिषदेचे श्रमिक कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.





