
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमध्ये तरुणांचा मोठा समावेश…
अमळनेर:- दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिराला देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक, देव दर्शन घेतले.
विशेष पौराणिक महत्त्व असलेल्या पाडव्याच्या दिवस आणि शासकीय सुटी यामुळे आयुष्यात सारे काही मंगल व्हावे यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांमध्ये तरुण वर्गाचा मोठा समावेश होता, हे विशेष. आदल्या दिवशीच (सोमवारी) अनेक भाविक मंदिरात मुक्कामी होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेने त्यांची उत्तम बडदास्त राखली होती. पहाटे पाच वाजेपासून अभिषेक, पूजा व दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या अलोट गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होेते.

विशाखापट्टणमहून आलेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाचे केले कौतुक…
अनेक भाविकांना या मंदिरात आलेले दिव्य मंगलमय अनुभव पाहून व ऐकून आम्ही येथे आलो.येथील प्रशासन, स्वछता, प्रसाद, पूजा पद्धतीने आम्ही खूप प्रभावित झालो आहोत. आता आम्ही वारंवार येवू असे विशाखापट्टणम येथून आलेल्या नल्ला श्वेता यांनी सांगितले.

