
अमळनेर:- तालुक्यातील अंतूर्ली येथे डीवायएसपींच्या पथकाने सट्टा जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली असून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पीएसआय विलास पाटील, हेकॉ मेघराज महाजन, पो. कॉ. हितेश बेहरे यांनी डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील अंतूर्ली येथे छापा टाकला असता अनिल जगदेव हा सट्टा घेताना दिसून आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०७० रुपयांचा मुद्देमाल व सट्टा जुगाराचे साहित्य मिळून आले. त्यावरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहेत.

