
अमळनेर तालुका मन्सुरी पिंजारी बिरादरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन…
अमळनेर:- पिंजारी समाजाच्या कब्रस्थानाला संरक्षण भिंत आणि समाजासाठी सामाजिक सभागृह स्थानिक विकास निधीतून बांधून द्यावे, अशी मागणी अमळनेर येथील तांबेपुरा परिसरातील पिंजारी मन्सुरी बांधवानी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. तालुका अमळनेर मन्सुरी पिंजारी बिरादरीतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
मंत्री अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोरी नदीला लागून कब्रस्तान असून तेथे नदीचे पाणी येते. त्यामुळे तेथील माती वाहून जात असते. म्हणून सदर कब्रस्थानाला संरक्षण भिंतीची अत्यंत आवश्यकता आहे. तसेच रात्री करीता स्ट्रीट लाईट, हायमस्ट लाईट बसवण्यात यावे. अल्पसंख्यांक पिंजारी मन्सुरी समाजातील रहिवाशी नागरीकांना त्यांच्या समाजाचे लहान-मोठे कार्यक्रमासाठी आमच्या वस्तीत सामाजिक सभागृह बांधकाम करण्यात यावे. कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी सिमेंट कॉक्रीटीकरण रस्ता तयार करण्यात यावा. सात्वंन शेड तयार करण्यात यावे. शौचालय बांधकाम करण्यात यावे, अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर तालुका अमळनेर मन्सुरी पिंजारी बिरादरी तालुकाध्यक्ष सलिम महंमद पिंजारी, तालुका सचिव अशपाक रहेमान पिंजारी यांच्या सह्या आहेत. यावेळी इस्माईल पिंजारी, मोयोदीन पिंजारी, मुक्तार खाटीक, कासम पिंजारी, बशीर पिंजारी, इसामु पिंजारी, जैनोद्दिन पिंजारी, अरमान पिंजारीसह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

