
अमळनेर:- तालुक्यातील ढेकु बु. तांडा येथील शेतकऱ्यांची तीन गोऱ्हे अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना दिनांक २६ रोजी मध्यरात्री घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ढेकु बु. तांडा येथील शेतकरी दशरथ पवार यांची गुरे घरासमोर गोठ्यात बांधली होती. दिनांक २७ रोजी पहाटे ते उठून गोठ्यात गेले असता त्यांची दोन गोऱ्हे दिसून आले नाही. त्यांचे बांधलेले दोर कापलेले दिसून आल्याने चोरट्यांनी चोरुन नेल्याची खात्री पटली. तसेच त्याच रात्री गावातील दिनेश जाधव यांचा गोऱ्हा देखील चोरीस गेल्याने २३ हजार किमतीचे तीन गोऱ्हे चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास हे. कॉ. श्रीकांत शिंपी हे करीत आहेत.

